समृद्ध गाव प्रकल्प

आनंदी व समृद्धी गाव निर्माण करण्यासाठी… आधुनिक भारतात, उद्योगातून रोजगार मिळू शकत नाही. म्हणून गावातच रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि गाव समृद्ध आणि आनंदी झाले पाहिजेत. त्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प

लोकसहभागातून ग्रामविकास – गाव हे विकासाचे केंद्र

संकल्पना – समृद्ध गाव प्रकल्प आनंद व समृद्धी गाव निर्माण करण्यावर केंद्रीत आहे. उलट देशाचे लक्ष सहाराच्या ठिकाणी उद्योग विकसित करण्यात गेले. परिणामत ६० % भारतीय जनताही खर्‍या विकासापासून वंचित राहिली. आधुनिक भारतात, उद्योगातून रोजगार मिळू शकत नाही. म्हणून गावातच रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि गाव समृद्ध आणि आनंदी झाले पाहिजेत. करोना कांडातून हेच आपण शिकले पाहिजे.

समृद्ध गाव या संकल्पनेतून पोखरण, किर्लोस आणि ओरोस क्लस्टर विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत आहे. गावांचा सामुदायिक विकास करणायच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान किर्लोस या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. समृद्ध गाव हाच उद्देश नजरेसमोर ठेवून मा. ब्रिगे. सुधीर सावंत यांनी स्थानिक आमदार, लोक प्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुंबई मंडळ ,कृषि अधिकारी, शिक्षक, आरोग्य सेविका, बचत गट महिला प्रतिंनिधी, गावातील सक्रीय लोक यांच्या उपस्थितीत गावांमध्ये अनेक बैठका घेतल्या. ह्या बैठकांमध्ये गावामध्ये आनंदी आणि समृद्ध समाज कसं बनवता येईल ह्यावर चर्चा करून एक विकास आढावा बनवला आहे. ह्या चर्चे अंती गावातील वरील सर्व घटकांना एकत्रित करून एक गाव विकास संघ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले.

समृद्ध गाव ही संकल्पना यशस्वी व्हायची असेल तर गावातील लोकांचा प्रभावी सहभाग अपेक्षित आहे. महात्मा गांधीजींनी स्वयंपूर्ण खेड्याचे स्वप्न दाखवले होते. रंतु स्वांत्रत्योत्तर काळात याचा गांभीर्याने विचार न केल्यामुळे गाव ओस पडू लागले व रोजगारासाठी माणसे शहराकडे धाव घेऊ लागली. त्यामुळे शहरांमध्ये सोयी सुविधा निर्माण करणेसाठी ताण पडत आहे. लोकांचे जीवन सुद्धा असुरक्षित झालेले आहे. म्हणून ह्यावर उपाय म्हणून गाव हा केंद्र बिन्दु मानून गाव स्वयंपूर्ण करणे ही काळाची गरज आहे. हे सर्व करणायसाठी समृद्ध आणि आनंदी गाव ही संकल्पना सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान ने प्रस्तावित केलेली आहे.

समृद्ध गाव ही योजना खालील तत्वांवर आधारीत आहे

 • १. एकात्मिक गाव विकास – सामूहिक उत्पादन
 • २. शहरातून पैसा खेड्याकडे वळवणे – स्वावलंबन
 • ३. आरोग्य ही संपदा – रोगमुक्त
 • ४. आनंदी जीवन
 • ५. सहजीवन

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान ही संस्था गावामध्ये वेळोवेळी येऊन उत्पादन, फळ प्रक्रिया, जारपेठ अशाप्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांचे सहाय्य घेवून प्रशिक्षण व मार्गदर्शन करेल. सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान ही संस्था समृद्ध गाव योजनेत एक दुवा म्हणून काम करेल. याचबरोबर गावची ग्रामपंचायत, स्थानीक गाव समिती, मुंबई मंडळ, लोक प्रतिंनिधी यांनी समृद्ध गावाचा आराखडा कार्यान्वित करण्यासाठी शासन, कंपन्यांचे ७98२, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या कामात सहभाग घेणे अपेक्षीत आहे.

“समृद्ध गाव” प्रकल्पाची 20 कलमी कार्यक्रम

 1. गावातीलप्रत्येकव्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणे.
 2. गावातीलप्रत्येकालास्वावलंबी करणे.
 3. दैनंदिनगरजेच्यावस्तु गावातच बनवण्याची व्यवस्था करणे, त्यायोगे गावातील पैसा गावातच ठेवणे.
 4. नैसर्गिकशेतीपद्धतीच्या माध्यमातून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे
 5. नैसर्गिक शेती पद्धतीतून रसायन मुक्त व सकस अन्नधान्य निर्माण करणे व इतर कृषि माल निर्माण करणे
 6. गावातील पिकांच्या स्थानिक जातींचे संवर्धन करणे
 7. औषधीवनस्पतींचीओळख व लागवड करून देणे
 8. गावातील प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यवस्था करणे
 9. गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे
 10. पिण्याचे पाणी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे
 11. पर्यावरण रक्षण करणे
 12. योग व क्रीडा यांच्या सोयीसुविधा निर्माण करणे
 13. सांस्कृतिक चळवळीतून जीवन आनंदी करणे
 14. गोसंवर्धन चळवळ राबविणे व पशु ससाधनांचा उत्पन्नासाठी योग्य वापर करणे.
 15. गाव प्रगतीपथावर नेण्यासाठी स्थानीक नेतृत्व निर्माण करणे
 16. गावातील शेतमालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देणे व त्या आधारावर उद्योग उभारणे
 17. कृषिमाल व बचत गटांना बाजार पेठ उपलब्ध करून देणे.
 18. गावातील नैसर्गिक साधन संपत्ती व पाणलोट व्यवस्थापन करणे.
 19. गाव तंटामुक्त करणे.
 20. स्वच्छता अभियान राबविणे

प्रकल्पाचा कालावधी – समृद्ध गाव हा प्रकल्प पुर्णपणे यशस्वी होण्यासाठी साधारणपणे 05 वर्षाचा कालावधी लागेल.

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान ही संस्था काय करते

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान ही संस्था गेली वीस वर्षे शेतकर्री व ग्रामीण विकास या विषयावर ्रभावीपणे काम करत आहे. समृद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान प्रसार व ग्रामीण संघटन या बाबतीत प्रभावी काम सातत्याने केलेले आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान अंतर्गत भारत सरकार पुरस्कृत कृषि विज्ञान केंद्र (</<) व महाराष्ट्र शासन पुरस्कृत कृषि महाविद्यालय व कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांचा उपयोग होत आहे.

समृद्ध व आनंदी गाव योजनेमध्ये लोकसहभागातून गावचा विकास करून उत्पन्न व उत्पादकता वाढवण्यावर भर आहे. शाश्वत पद्धतीने उपजीविकेची सुरक्षितेता करिता नैसर्गिक शेती पद्धतीवर भर देण्यात आला आहे. गावातील लोकांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य व ज्ञान वाढविण्यात येत आहे. दीर्घकालीन शाश्वत रोजगार निर्मिती, कृषि आधारित अर्थव्यवस्था करून कृषि व पशुधन विकास करण्यात येत आहे. रोबोटिक्समुळे नोकऱ्या नष्ट होत आहेत. २०२४ पर्यंत भारतात ६७% नोकऱ्या नष्ट होणार आहेत. मग मानवाला जगायला शेती हे एकमेव शाश्वत साधन उरणार आहे.

शेती आकर्षक नाही कारण उत्पन्न नाही. त्याला आपणच करणीभूत आहोत. शेतमाल जर थेट ग्राहकांकडे विक्री करता आला तर शेती उत्पन्न प्रचंड वाढेल. त्याचबरोबर शेती मध्ये गुंतवणूक कमी केल्यास फायदा वाढेल. रासायनिक खत आणि किटक नाशक यावर बंदी आणल्यास शेतीतील 80 % खर्च कमी होतो. निश्चितपणे शेती फायदेशीर होईल.

अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. आज भारतात सेवा क्षेत्र ६०%, उद्योगक्षेत्र २२% आणि कृषि क्षेत्र १८% आहे. रंतु रोजगाराच्या बाबतीत मात्र कृषि क्षेत्रावर ७०%लोक अवलंबून आहेत. याचा निष्कर्ष असा निघतो की रोजगार निर्मिती ही कृषि क्षेत्रात अडकलेल्या लोकांसाठी झाली पाहिजे. गावांमध्ये संपत्ती आणि संपन्नता आली पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान संपत्ती निर्मितीचा पाया आहे. गावांमध्ये पैसा आणि संपत्ती कशामुळे निर्माण होईल व गावच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन कसे होईल, हाच समृद्ध गाव योजनेचा विषय आहे.

समृद्ध गाव हा खर्‍या अर्थाने लोकांनी लोकांसाठी चालविलेला प्रकल्प आहे. गावामध्ये स्वत: साठी रोजगार निर्माण करणे. सेच जीवन आनंदी बनविण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या गावातच निर्माण होण्यासाठी एकमेकांची मदत घेऊन त्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी लागणार्‍या कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने भाग घेणे अपेक्षित आहे. गावात त्याची अंमलबजावणी गावासाठी तयार झालेल्या गाव गटामार्फत पूर्ण करण्यात येईल. समृद्ध गावाची चळवळ यशस्वी होण्यासाठी सक्षम लोकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये पुढे येऊन नेतृत्व करणे अपेक्षित आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान किर्लोस

समृद्ध गाव प्रकल्पाची संकल्पना ही “सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानने” मांडलेली आहे. संकल्पनेमागे सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान ही संस्था मध्यस्थाची भूमिका बजावणार आहे. संस्थेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये आपली सेवा देतील. बाहेरच्या जगाशी संस्था संपर्क वाढवून या कार्याला सरकारी व खाजगी मदत मिळवून देईल. समृद्ध गाव प्रकल्प यशस्वी होण्यासाठी व प्रकल्पाची अमलबजावणी करणेसाठी गाव विकास संघाला मदत करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान ही संस्था करेल.

गाव विकास संघ

हा संघ दर महिन्याला बैठक घेऊन कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, आढावा घेणे, निधि उभारणे यांचे नियोजन करेल.

 1. गावातल्या सक्षम व नेतृत्व करणार्‍या लोकांचा हा संघ आहे.
 2. हा संघ राजकारण विरहित राहील.
 3. समृद्ध गावाची चळवळ रुजवणे व यशस्वी करण्यासाठी प्राधान्याने कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे, याचे नियोजन करण्याचे काम हा गट करेल. यासाठी गावची ग्रामपंचायत इतर शासकीय, आशासकीय विभाग, गावातील प्रस्थापित मंडळे यांचा सहाय्य हा गत घेईल.
 4. समृद्ध गावात आयोजित करण्यात येणार्‍या विविध उपक्रमांसाठी निधि उभारण्याकरता गावविकास गट समिती प्राधान्याने काम करेल त्यासाठी सुद्धा ते वेगवेगळ्या विभागांची मदत घेण्यात येईल.
 5. गावातले शेतकरी, स्त्रिया, युवक, विद्यार्थी यांना प्रोत्साहित करून प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेण्यासाठी तयार करण्याचे काम गावविकास गट करेल.

समृद्ध गावाच्या विकासात प्रत्येक वाडीच्या विकासाचे उद्दीष्ट ठेवून काम करण्यात येईल. प्रत्येक वाडी ही समृद्ध वाडी गट लोकांनी नेमण्यात यावा. वाडीचे सूक्ष्म नियोजन हा वाडी संघ करेल. त्याला गाव विकास संघ पूर्ण मदत करेल. गाव विकास संघास प्रत्येक क्षेत्रात दोन – तीन जणांचा उपगट मदत करेल.

ग्रामपंचायत भूमिका

ग्रामपंचायत हे गाव विकासाला दिशा देणारे मुख्य केंद्र आहे. गावचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांनी गावाच्या विकासाचे धोरण ठरवणे, त्यासाठी निधि उपलब्ध करून देणे, व विकासकामाची अंमलबजावणी करणे ही महत्वाची भूमिका ग्रामपंचायतीने पार पाडणे अपेक्षित आहे. आपला गाव आनंदी आणि समृद्ध बनवण्यासाठी आपल्या नेहमीच्या कामासोबतच खालील बाबी करणे.

 • गाव विकास गटाची स्थापना करणे.
 • विकास संघाने वेळोवेळी आयोजित बैठकांना सहकारी गाव विकास सघाने वेळोवेळा आयोजित केलेल्या बठकाना सहकारा करणे.
 • महिन्यातून एकदा बैठक घेणे.
 • समृद्ध गाव योजना बनवण्यासाठी सहभाग घेणे.
 • योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेणे.
 • योजनेसाठी निधी उभारण्यास मदत करणे. काही निधी ग्रम्पाच्यातीसाठी उभारण्यात येईल तर काही निधी संस्थांसाठी उभारण्यात येईल.
 • सर्व शासकीय विभागांना समृद्ध गाव योजनेत सहभागी करणे व मदत करणे.
 • शेतकरी, विध्यार्थी सहली आयोजित करणे.
 • शक्‍यतो प्रशिक्षणासाठी लागणारा निधी स्वत:च्या किंवा जिल्हा परिषद ॥)२(0)॥ योजनेतून उभा करणे.
 • विकास गट मध्ये चर्चा करून ग्रामपंचायतीचा सहभाग निश्चित करणे.

समृद्ध गाव प्रकल्प आपल्या गावात राबविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव तसेच इतर वेळोवेळी लागणारे ठराव ग्रामपंचायत ने उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

शिक्षक

खालील गोष्टी शिक्षकांच्या नेतृत्वाखाली करण्यात येतील.

 • आरोग्य चाचणी करणे व विद्यार्थ्यांचे आरोग्य कार्ड संगणकाद्वारे बनवणे व नोंद करणे.
 • पौष्टिक भाजीपाल्याचे उत्पादन करणे. त्यासाठी पालक बचत गट व विद्यार्थ्यांचा उपयोग करणे.
 • क्रीडा प्रशिक्षण देणे व विद्यार्थ्यांसाठी व गावासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करणे.
 • कलेचे प्रशिक्षण देणे, कला स्पर्धा आयोहित करणे.
 • चांगले वक्ते बोलवून विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्रबोधन करणे.
 • विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनवण्यासाठी हालचाल करणे.
 • विद्यार्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत करतील.
 • आधुनिक तंत्रज्ञान व संगणकीय शिक्षण देणे.
 • पालक गटाचा उपयोग ॥1ग करून माध्यान्ह भोजन तयार करणे व पौष्टिक आहार ठा बनवणे. .
 • वेगवेगळ्या प्रदर्शन आणि स्पर्धांमध्ये भाग घेतील.

बचत गट

महिला बचत गटाच्या माध्यमातून गावातील मनुष्यबळाच्या संघटनाचे काम प्रभावीपणे होऊ शकते. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करन विविध उत्पादने तयार करण्याचे काम बचत गट करू शकते. त्या माध्यमातून गावामध्ये आर्थिक उलाढाल वाढेल व गावातील प्रत्येक कुटुंब आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यास मदत होईल.’ बचत गटांनी खालील बाबींमधून उत्पादन वाढवणे अपेक्षित आहे.

 1. नैसर्गिक शेती करणे
 2. शेतीमालाची प्रक्रिया करणे.
 3. कुटीर उद्योग उभारणे.
 4. सर्व मालाची विक्री सिंधूद्रग जिल्हा कृषि प्रतिष्ठानच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार व त्यांनी बनविलेल्या विक्री आराखड्यानुसार करण्यात येईल.
 5. सल्ल्यानुसार विक्री करणे.
 6. कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन, करणे.
 7. गोशाळा उभारणे
 8. हस्तकलाचे प्रशिक्षण घेऊन विक्री साठी माल तयार करणे.
 9. संगीत नाटक तसेच इतर कला शिकणे व स्पर्धांमध्ये भाग घेणे.
 10. पोष्टिक आहर शाळेच्या मुलांसाठी तयार करणे.
 11. प्रत्येक महिलेने दररोज ‘योगा’ किंवा इतर व्यायाम करून आपली क्षमता वाढवली पाहिजे. तसेच सकस आहार घेऊन अनिमिय हद्दपार केला पाहिजे.

नेहरू युवा मंडळ

प्रत्येक गावात नेहरू युवा मंडळ स्थापन करण्याची सरकारी योजना आहे. तिच्याबरोबर संलग्न राहून गावात किंवा वाडीत ही मंडळे स्थापन करण्यात यावीत. त्यांनी आपले काम व उद्दिते बनवावीत. त्यात प्रामुख्याने

 • युवकांसाठी रोजगाराच्या संधि उपलब्ध करणे.
 • क्रीडा स्पर्धा आयोजित करणे.
 • सांस्कृतिक प्रशिक्षण व सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करणे.
 • रोग्य सेवा – गावामध्ये आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी साहाय्य करणे.
 • माहिती तंत्रज्ञान – गावामध्ये संगणक साक्षरता निर्माण होण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करणे.
 • विविध स्पर्धेचे आयोजन करणे.
 • सहलीचे आयोजन करणे.
 • व्याख्याने – प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची व्याख्याने गावातील लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करणे.
 • कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे.
 • स्पर्धा परीक्षा केंद्र माहिती व प्रशिक्षण केंद्र गावामध्ये स्थापन करणे.

समृद्ध गावामध्ये पुढीलप्रमाणे विकासाच्या संकल्पना राबविल्या जातील

 1. उत्पन्न आणि रोजगार निर्मिती
 2. नैसर्गिक शेती व पीक लागवड
 3. पशुसवर्धन
 4. शेतीवर आधारित उद्योग
 5. ळ प्रक्रिया
 6. रोपवाटिका
 7. कुटीर उद्योग
  1. दैनंदिन गरजेच्या वस्तु बनविणे – उदा. साबण बनविणे
  2. मसाले व खाद्यपदार्थ बनविणे
 8. बचत गट स्थापन करणे
 9. कृषि पर्यटन
 10. करियर डेव्हलपमेंट
 11. बाजारपेठ व विक्री व्यवस्था तयार करणे
 12. राज्य व केंद्र शासनाच्या योजना राबविणे
 13. आरोग्य, क्रीडा, योगा, परसबाग – आयुर्वेद, औषधी वनस्पती लागवड, कला, गायन, कीर्तन, भजन, हस्तकला, नृत्य, वादन, फुगडी, चित्रकला, वकृत्व, पर्यावरण – वृक्षलागवड, स्वछता मोहीम, जमिनीचे आरोग्य, बायोगॅस, मनुष्यबळ निर्मिती
 14. विविध विषयांवरील कौशल्य प्रशिक्षण
 15. संगणक व इतर प्रशिक्षणे
 16. स्वयंसहायत्ता गट/ शेतकरी गट यांचे सक्षमीकरण करणे
 17. पाणलोट क्षेत्र

विकास राबविताना चे नियोजन करण्यासाठी समृद्ध गाव ही सकल्पना राबविताना गावामध्ये करावयाच्या उपक्रमांचे नियोजन क तसेच गावातील लोक व शासन स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी “एक गाव विकास संघ” स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या गाव विकास समितीमध्ये सर्व साधारणपणे खाली नमूद केलेल्या व्यवक्तींचे प्रतिनिधित्व हवे असे ठरविण्यात आले.

 1. गावचे सरपंच किंवा त्यांचे प्रतिनिधी
 2. महिला बचत गट प्रमुख व प्रतिनिधी
 3. शेतकरी गट व मंडळाचे प्रतिनिधि
 4. ग्रामीण युवक
 5. ग्रामीण उद्योजक
 6. गावातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी
 7. अंगणवाडी सेविका
 8. आरोग्य विभागाचे प्रतिनिधी
 9. कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ / अधिकारी
 10. कृषि विभागाचे प्रतिनिधी
 11. सहकार सोसायटीचे प्रतिनिधी
 12. गावातील मुंबई मंडळाचे प्रतिनिधी
 13. आशा सेविका
 14. $ट९? प्रतिनिधी