रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण

ओरोस दि. १४ फेब्रु – सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान संचालित, कृषि विज्ञान केंद्राचे रोपवाटिका व्यवस्थापन आणि अंडी उबवणूक तंत्र या विषयांची प्रशिक्षणे सुरू करण्यात आली. कृषि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सदडेकर ग्लोबल ग्रुपचे अध्यक्ष व उद्योजक श्री. चंद्रकांत सदडेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे विभागीय अधिकारी श्री. रामचंद्र गावडे, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. शिंपी उपस्थित होते.

यावेळी ब्रिगे. सुधीर सावंत यांनी मार्गदर्शन केले. या देशातील प्रत्येक गाव समृद्ध होणे, गरजेचे आहे. जेणेकरून आपला देश समृद्ध होईल. कृषि प्रतिष्ठान द्वारे या वर्षी कुंदे, कुसबे, पोखरण या गावामध्ये समृद्ध गाव योजना राबविणार आहोत असे ते म्हणाले.

गावाच्या सर्वागिण विकासासाठी प्रयत्न करून गावातच रोजगार निर्माण करण्यासाठी ग्रामस्थ व महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार. कोणत्याच सरकारच शेतीकडे लक्ष नाही. नैसर्गिक शेतीची सुरुवात करून गावातील कुटुंबाचे व जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. शेती आधारीत उद्योग गावात निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असे ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले.

उद्योजक चंद्रकांत सदडेकर यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी यांना रोजगार व उद्योग निर्माण करण्याच्या नव्या दिशा यावर व्याख्यान दिले. जिल्हा उद्योग केंद्राचे विभागीय अधिकारी रामचंद्र गावडे यांनी आपल्या विभागाच्या योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकार डॉ. शिंपी यांनी उपस्थितांना जिल्ह्यामध्ये पशुसवर्धन व्यवसायामध्ये कशा प्रकारे वाव आहे हे विषद केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मंदार गीते यांनी उपस्थित राहून प्रास्ताविक केले. प्राचार्य आशीष पाटील, आनंद सावंत कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी व कृषि पदवीधर उपस्थित होते. कृषि महविद्यालय ओरोस येथे नर्सरी व्यवस्थापन व अंडी उबवणूक तंत्र या विषयाचे प्रशिक्षण सुरू झाले. यामध्ये ४० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. नर्सरी व्यवस्थापन प्रशिक्षणाचे समन्वयक शास्त्रज्ञ सरिता बेळणेकर व अंडी उबवणूक तंत्र प्रशिक्षणाचे समन्वयक शास्त्रज्ञ डॉ. केशव देसाई आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचलन कृषि विस्तार तज्ञ डॉ. विलास सावंत यांनी केले तर आभार शास्त्रज्ञ श्री. भास्कर काजरेकर यांनी मानले.