सिंधु ऍग्रो फेस्ट व कृषि प्रदर्शन 2016

“जमिनी विकू नका, जमिनीतून उत्पन्न मिळवा” – डॉ. स्वामिनाथन यांचे अध्यक्षेतेखाली किसान राऊंड टेबल परिसंवाद, सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, किर्लोस तर्फे सिंधु अॅग्रो फेस्ट व भव्य कृषि प्रदर्शन – १७ ते २० फेब्रुवारी २०१६ – जिजामाता उद्यान, ओरोस

भारताच्या हरित क्रांतीचे जनक व जागतिक किर्तीचे कृषि शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन, मा. स्वामिनाथन यांना भारत कृषि रत्न पुरस्कार देऊन सन्मान, शेतकरी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विस्तार कार्यकर्ते व कृषि पदवीधर, लघु आणि मोठे उद्योजक यांचा सहभाग

स्थानिक आमदार-खासदार, दापोली कृषि विद्यापीठ, अकोला विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, तसेच जागतिक किर्तीचे कृषि तज्ञ श्री. रमेश ठाकरे, श्री. गजभिये, श्री. शुक्ला, माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य सचिव श्री. गौतम, श्री. महेश फाटक व राज्य सरकारचे अन्य ज्येष्ठ कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शन

श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (मुंबई), डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र शासन कृषि विभाग, सुवर्ण कोंकण, भारत कृषक समाज, ICAR, ATARI, SAMMETI यांचे सहकार्य

१. सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानच्या कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय व मुक्त कृषि शिक्षण केंद्र यांच्यातर्फे विविध पिक प्रात्यक्षिके
२. शाश्वत शेती करण्याचा प्रकल्प, सामूहिक शेती करण्याच्या संकल्पनेची सुरुवात, गंगामा सर्कल, तसेच औषधी व सुगंधी वनस्पतीचे प्रकल्प
३. कोकणातील कृषि क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्याृ शेतकर्यांकचा व प्रक्रिया उद्योगातील उद्योजकांचा देखील याप्रसंगी गौरव
४. विविध बि–बियाणे, अवजारे, खते, किटकनाशके, कृषि प्रकाशने, बचतगट उत्पादने, जनावरे व माहिती तंत्रज्ञान
५. जिजामाता उद्यान येथे कायमस्वरूपी बाह्य-रुग्ण विभाग (जिजामाता हॉस्पिटल) आणि शेतकरी बाजार (Farmers Market) यांची सुरुवात

या वर्षापासून सिंधुदुर्ग किल्ला ते जिजामाता उद्यान “”शिवज्योत मॅरेथॉन””ची सुरुवात, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सवात त्याचबरोबर कोकणी फुड स्पर्धा, नृत्य स्पर्धा, झाकडी नृत्य इ.