About Us

In order to bring the changes in the farmer’s view towards agriculture, Sindhudurg Zilla Krishi Pratishthan, a farmer’s co-operative trust was established in the year 1997 at Kirlos under the chairmanship of Brig. Sudhir Sawant. The trust is working for the upliftment of the farming community with its established Institutes, namely KVK (Kissan Vikas Kendra) & CSASKO (Agri-College).. Some of the important regular projects are as follows

♦ Experimental Farm ♦ Nursery ♦ Poultry Farming ♦ Dairy & Goatry Farming Rural ♦ Agriculture Work Experience & ♦ Samruddha Gav Yojana

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान ही संस्था गेली वीस वर्षे शेतकर्री व ग्रामीण विकास या विषयावर प्रभावीपणे काम करत आहे. गाव समृद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान प्रसार व ग्रामीण संघटन या बाबतीत प्रभावी काम सातत्याने केलेले आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान अंतर्गत भारत सरकार पुरस्कृत कृषि विज्ञान केंद्र (KVK) व महाराष्ट्र शासन पुरस्कृत कृषि महाविद्यालय व कृषि व्यवसाय
व्यवस्थापन महाविद्यालय यांचा उपयोग होत आहे.

प्रतिष्ठानतर्फे राबविल्या जाणार्‍या विविध योजनांतून लोकसहभागाच्या गावचा विकास करून उत्पन्न व उत्पादकता वाढवण्यावर भर आहे. शाश्वत पद्धतीने उपजीविकेची सुरक्षितेता करिता नैसर्गिक शेती पद्धतीवर भर देण्यात आला आहे. गावातील लोकांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य व ज्ञान वाढविण्यात येत आहे. दीर्घकालीन शाश्वत रोजगार निर्मिती, कृषि आधारित अर्थव्यवस्था करून कृषि व पशुधन विकास करण्यात येत आहे. रोबोटिक्समुळे नोकऱ्या नष्ट होत आहेत. २०२४ पर्यंत भारतात ६७% नोकऱ्या नष्ट होणार मग मानवाला जगायला शेती हे एकमेव शाश्वत साधन उरणार आहे.

शेती आकर्षक नाही कारण उत्पन्न नाही. त्याला आपणच करणीभूत आहोत. शेतमाल जर थेट विक्री करता आला तर शेती उत्पन्न प्रचंड वाढेल. त्याचबरोबर शेती मध्ये गुंतवणूक कमी केल्यास फायदा वाढेल. रासायनिक खत आणि किटक नाशक यावर बंदी आणल्यास शेतीतील 80 % खर्च कमी निश्चितपणे शेती फायदेशीर होईल.

अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. आज भारतात सेवा क्षेत्र ६०%, उद्योगक्षेत्र २२% आणि कृषि क्षेत्र १८% आहे. परंतु रोजगाराच्या बाबतीत मात्र कृषि क्षेत्रावर ७०%लोक अवलंबून आहेत. याचा निष्कर्ष असा निघतो की रोजगार निर्मिती ही कृषि क्षेत्रात अडकलेल्या लोकांसाठी झाली पाहिजे. गावांमध्ये संपत्ती आणि संपन्नता आली पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान संपत्ती निर्मितीचा पाया आहे. गावांमध्ये पैसा आणि संपत्ती कशामुळे निर्माण होईल व गावच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन कसे होईल, हा समृद्ध गाव योजनेचा विषय आहे.